भाजप – शिवसेनेचा तिढा सुटणार?

भाजप – शिवसेनेचा तिढा सुटणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य आता काही तासात सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी बोलताना अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री अशी काही चर्चा झालीच नव्हती, असे वक्तव्य केले होते. त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि वादला सुरुवात झाली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले वक्तव्य मागे घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार होत आहे, असे समजत आहे. याचबाबत स्पष्टीकरण दिले जाईल आणि जो दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे तो सुटला जाणार असल्याची शक्यता आहे.

महायुतीचा तिढा सुटणार

विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला पार पडल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवाळीच्या दिवशीच्या वक्तव्यानंतर सुरु झाली आहे. त्यानंतर दररोज शिवसेना खासदार संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. या सगळ्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, आताच्या परत्रकार परिषदेनंतर हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

First Published on: November 8, 2019 3:53 PM
Exit mobile version