विरोधकांची खलबत्ते सुरुच

राज्यात सुरु असलेल्या सरकार स्थापनेचा संघर्ष अद्याप संपलेला नसताना शुक्रवारी महायुतीत दोन्ही पक्षांमधील मतमतांरे समोर आल्यानंतर आता सगळ्यांचे विरोधकांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे. राज्यपाल्यांच्या भूमिकेवर आपली आगामी भूमिका ठरविणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यासाठी आता बैठकांचे फार्स शनिवारीही सुरु असल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळाले. या बैठकींचे केंद्रस्थान मात्र सिल्वर ओक हे शरद पवारांचे निवासस्थान असल्याचे दिसून आले असून आता पवारांनी शनिवारी पुन्हा एकदा आम्ही विरोधात बसणार असल्याचे जाहीर करीत राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला वेगळे वळण मिळाले आहे.

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षासाठी शनिवारच्या दिवस हा निर्णयाक दिवस होता. मात्र सत्ताधार्‍यांमध्ये फूट फडल्याने आता सर्वांचे लक्ष हे महाआघाडीकडे लागून राहिले आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सिल्वर ओक गाठल्याने विरोधकांच्या खलबत्ते सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनजंय मुंडे, छगन भुजबळ यांनी सकाळपासून सिल्वर ओकवर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आगामी भूमिकेसाठी हे नेतेमंडळीमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान,यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, येत्या १२ नोव्हेंबरला आपण मुंबईत सर्व आमदारांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतर आपली पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर विरोधात बसण्याची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, बीजेपी-शिवशेनेने सरकार बनवावे आम्ही आम्ही विरोधात कधी बसणार याची वाट बघत आहोत. तर इतक्या वर्ष सेनेने बीजेपीशी चर्चा केली. आत्ता आमच्याशी चर्चा करत आहेत यात चुकीच काय आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी अप्रत्यक्षरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तर कोणी कोणाला खोटं ठरवू नये,एवढ्या वर्षाचे बीजेपी-सेना मित्र पक्ष आहेत,मी एक वडीलधारी म्हणून सांगतो, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला.

सेना बीजेपी एकत्र येईल असे वाटत नाही – प्रफुल्ल पटेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी झालेल्या आरोप प्रत्यारोपांबाबत प्रफुल्ल पटेल यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, बीजेपी-सेनेने सरकार स्थापन करावा असं आम्हाला वाटत आहे,पण तसं झालं नाही तर आम्हाला याबाबत विचार करता येईल . तर कालच्या बीजेपी-सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही. आणि आले तरी राज्याच्या हिताचे विचार करतील असा विश्वास महाराष्ट्राची जनता यावरती विश्वास ठेवणार नाही, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर नाईलाजाने एकत्र आले तर सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, अशी शक्यता ही त्यांनी यावेळी लगाविली.

First Published on: November 10, 2019 5:52 AM
Exit mobile version