Mega Block : रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

Mega Block : रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

संग्रहित छायाचित्र

रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वेच्या (Harbor Railway) उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड (Matunga to Mulund) स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला असून, मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. तसेच, हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल- वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरळीत वाहतुकीसाठी अद्ययावत यंत्रणांचा वापर

मध्य रेल्वेवरील ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ०३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील ब्लॉक

सकाळी १०.३३ ते दुपारी ०३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

सकाळी ११.०२ ते दुपारी ०३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


हेही वाचा – डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन, नागपुर येथे घेतला अखेरचा श्वास

First Published on: June 4, 2022 7:44 AM
Exit mobile version