आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडताना ‘हे’ वेळापत्रक वाचाच

आज मेगाब्लॉक! घराबाहेर पडताना ‘हे’ वेळापत्रक वाचाच

संग्रहित छायाचित्र

मुंबई – देखभाल, दुरुस्तीच्या कारणाकरता मध्य मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच, हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने वाहतूक सुरळीत राहील.

मध्य मार्गावर माटुंबा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असेल तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य मार्गावरल सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गवार वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तसंच या सर्व लोकल फेऱ्या २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरल सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या कालावधीत हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात पनवेल/बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/ नेरुळ-खारकोपर मार्गावर लोकलसेवा सुरू राहणार आहे.

First Published on: September 11, 2022 8:38 AM
Exit mobile version