मेळघाटातून जाणारा रेल्वेचा मार्ग बदला, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र!

मेळघाटातून जाणारा रेल्वेचा मार्ग बदला, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र!

उद्धव ठाकरे

मेळघाट व्याघ्र प्रकल्यापातून जाणारा अकोला-खांडवा हा रेल्वेमार्ग इतर पर्यायी भागातून न्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली आहे. व्याघ्र संवर्धनाला खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच प्राधान्य दिले आहे. असून व्याघ्र प्रकल्पांचे यश आपण जगभर सांगत असल्याकडेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वेमार्गाला मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे. रेल्वेमार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वेमार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे

काय म्हटलय मुख्यमंत्र्यांनी पत्रात

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर वाघांच्या अधिवासाला धक्का लागणार नाही. तसेच जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या १०० गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. १९७३-७४ मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. २७६८.५२ चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वेवाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली आहे.

बोर्डाने राज्य सरकारला हा प्रस्ताव पाटवून विचार करावा असे कळविले आहे. रेल्वेमार्गांचा विकास व्हायलात पाहिजे पण तसे करताना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रात नमुद केलं आहे.


हे ही वाचा – “गिरीश मला कोविड झाला तर..”, फडणवीसांच्या त्या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या अंगावर शहारे


First Published on: July 16, 2020 8:06 AM
Exit mobile version