घरCORONA UPDATE"गिरीश मला कोविड झाला तर..", फडणवीसांच्या त्या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या अंगावर शहारे

“गिरीश मला कोविड झाला तर..”, फडणवीसांच्या त्या वक्तव्याने भाजप नेत्यांच्या अंगावर शहारे

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून राज्याचा दौरा करत असून विविध ठिकाणची कोरोनासंदर्भातली परिस्थिती आणि सरकारच्या उपाययोजनासंदर्भातला आढावा घेत आहेत. अनेक राजकीय नेते आणि सरकारमधील मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर काही नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यावर असताना गिरीश महाजन यांच्याशी काही बोलत होते, त्यावेळी त्यांनी “मला जर कोरोना झाला, तर माझा इलाज मुंबईतील सरकारी रुग्णालयात करा”, असे महाजन यांना सांगितले.

महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केल्यांतर महाजन यांनी ती रिट्विट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यातील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. फडणवीस यांनी महाजन यांना सांगितले की, “गिरीश मी महाराष्ट्रभर फिरत आहे, मला कोविड बाधा होण्याची दाट शक्यता आहे. जर तसे झाले तर मला मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे. खासगी रुग्णालयात नाही.” फडणवीस यांचे हे शब्द ऐकून सगळ्यांच्या अंगावर शहारे आले असल्याचे कार्यकर्त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस या मानसिकतेत महाराष्ट्रात फिरत आहेत, याची देखील माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

- Advertisement -

फडणवीस राज्यभर दौरा करत असताना मुख्यमंत्री मात्र मातोश्रीवर बसून राज्यकारभार चालवत असल्याची टीका विरोधकांकडून केली गेली होती. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दौऱ्यांना आपत्ती पर्यटन असे म्हटले होते. तर फडणवीसांनी उत्तरादाखल ‘नया है वह’ म्हणत आदित्य ठाकरेंना टोमणा मारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -