“महिला आयोगाकडे पुरुषांच्याही तक्रारी येतात…” रुपाली चाकणकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

“महिला आयोगाकडे पुरुषांच्याही तक्रारी येतात…” रुपाली चाकणकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

बारामतीतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत चाकणकरांचे स्पष्टीकरण

महिला आयोग हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. महिला आयोगाकडे पीडित महिला न्याय मागण्यासाठी जात असतात. पण या आयोगाकडे फक्त महिलांच्याच तक्रारी येतात का? तर असे नाहीये. महिला आयोगाकडे पुरूष देखील तक्रारी घेऊन जात असतात. याबाबत स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. लेट्सअप मराठी या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रुपाली चाकणकर यांनी याबाबत सांगितला. तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यासोबत घडलेल्या एक मजेशीर सुद्धा यावेळी त्यांनी सांगितला.

महिला आयोगाकडे महिलांप्रमाणे पुरूष देखील तक्रार करतात का? या प्रश्नाला उत्तर देताना चाकणकर यांनी सांगितले की, हो आम्ही महिलांबरोबरच पुरूषांच्याही तक्रारी घेतो. तर यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “ज्या दिवशी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पहिली तक्रार एका पुरुषाची होती. ‘तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार हे समजताच मी खूप लांबून प्रवास करून आलो आहे. माझी तक्रार माझ्या पत्नीविरोधात आहे. पहिली तक्रार माझी घ्या’, असे त्या व्यक्तीने मला सांगितले. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने महिलांसाठी काम करत असलो, तरी आम्ही पुरुषांच्याही तक्रारी घेतो,”

“एखाद्या पुरुषाची तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित कुटुंबाला बोलवून त्यांचे समुपदेशन करतो. दोघांनाही समजावून सांगतो. कारण कुटुंब संस्था ही आपल्या समाजाचा पाया आहे. त्यामुळे कुटुंब टिकवण्यावर आमचा भर असतो,” अशी महिला आयोगाची भूमिका असल्याचे यावेळी रुपाली चाकणकर यांच्याकडून सांगण्यात आले.

तर महिला आयोग हे पक्षपातीपणे काम करते, असे आरोप करण्यात आलेले आहे. याबाबत बोलताना रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, “राज्य महिला आयोग पक्षपातीपणे काम करत नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या महिला लोकप्रतिनिधीवर खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याची स्वत:हून दखल घेतली. त्यामुळे आयोग पक्षपातीपणे काम करतो” असे सांगत चाकणकर यांच्याकडून आरोपांचे खंडन करण्यात आले.


हेही वाचा – ‘ऐ Twitter भइया…अब तो पैसा भी…’, Blue Tick हटवल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल

First Published on: April 21, 2023 4:17 PM
Exit mobile version