घरताज्या घडामोडी'ऐ Twitter भइया...अब तो पैसा भी...', Blue Tick हटवल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे...

‘ऐ Twitter भइया…अब तो पैसा भी…’, Blue Tick हटवल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल

Subscribe

आजपासून कुणालाही ट्विटरवर फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही. ट्विटरने रात्री 12 वाजल्यापासून जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना आता पेड सर्व्हिस घ्यावी लागणार आहे.

आजपासून कुणालाही ट्विटरवर फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही. ट्विटरने रात्री 12 वाजल्यापासून जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना आता पेड सर्व्हिस घ्यावी लागणार आहे. पैसे मोजल्यानंतरच त्यांना ब्ल्यू टिक मिळणार आहे. तरच यूजर्सना व्हेरिफाईड अकाऊंट मिळणार आहे. (bollywood amitabh bachchan reacted on removing twitter blue tick share tweet for ceo elon musk)

ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खानसह विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटचीही ब्ल्यू टिक हटवण्यात आले आहेत. मात्र, एलॉन मस्क याच्या या निर्णयावर अमिताभ बच्चन यांनी मजेदार ट्वीट केले आहे.

- Advertisement -

ट्विटरमधील या नव्या बदलाबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. एलॉन मस्कच्या या निर्णयावर काही लोकांनी मीम्सही बनवले आहेत. त्याच वेळी, सेलिब्रिटी देखील यापासून अस्पर्श राहू शकले नाहीत. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. ट्विट करताना त्यांनी एलॉन मस्कसाठी एक अनोखी आणि मजेदार पोस्ट लिहिली. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ट्विटरला ब्लू टिक परत देण्याची विनंती केली आहे. अमिताभ बच्चन यांनी सदस्यत्वासाठी पैसे दिले आहेत.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट

“ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा जोड़े पड़ी का ??”

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरसाठी लिहिलेली ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. बिग बींनी पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच ते 1300 हून अधिक लोकांनी रिट्विट केले. तिथे 14 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले.


हेही वाचा – पूंछमधील लष्करावरील हल्ल्यात 7 दहशतवादी असल्याचा संशय; एनआयएच्या पथकासह डीजीपी घटनास्थळी दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -