मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त; सोमय्या म्हणतात पुढचा नंबर कोणाचा?

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त; सोमय्या म्हणतात पुढचा नंबर कोणाचा?

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त; सोमय्या म्हणतात पुढचा नंबर कोणाचा?

अखेर करुन दाखवलेच असं म्हणत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याच्या तोडक कारवाईची व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अलिशान बंगल्यावर तोडक करवाई करण्यात आली आहे. नार्वेकर यांचा बंगला बेकायदेशीर बांधण्याता आला असून बंगला बांधण्यासाठी झाडे तोडण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला होता. नार्वेकर यांचा बंगला जमीनदोस्त झाला असून आता पुढचा नंबर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी अलिशान बंगला बांधला होता. या बंगल्याचे कामही सुरु होते. मात्र माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी हा बंगला बेकायदेशीर बांधला असल्याचा आरोप केला होता. सोमैय्यांच्या आरोपानुसार बंगल्यावर रविवारी सकाळपासून तोडक करवाई करण्यात येत आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. नार्वेकर यांच्या बंगल्यावर कारवाई केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आणकी एका शिवसेना नेत्याच्या रिसॉर्टवर तोडक कारवाई होणार असल्याचा दावा किरीट सोमैय्यांकडून करण्यात आला आहे.

नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त

मिलिंद नार्वेकर यांनी दापोली समुद्र किनारी दोन मजली अलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्याचे काम सुरु होते. मात्र बंगला बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाड तोडण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नार्वेकर यांच्या बंगल्यावर सकाळपासून तोडक कारवाई सुरु आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने बंगला तोडण्यात येत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ नुसार बंगल्याच बांधकाम मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले आहे. सोमवारी दापोलीला जाऊन या बंगल्याच्या तोडकामाची पाहणी करणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे.

पुढचा नंबर कोणाचा ?

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामागे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी वेगवेगळ्या यंत्रणांची चौकशी लावली आहे. आधीच शिवसेनेचा बडा नेता अडचणीत असताना मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडल्यामुळे शिवसेनाला मोठा धक्का मानला जात आहे. अनिल परब यांनी देखील दापोलीत सिसॉर्ट बांधला आहे. हा रिसॉर्ट समुद्र किनारी असून बेकायदेशीरपणे उभारला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. पुढील नंबर अनिल परब यांचा असल्याचा उल्लेख किरीट सोमैय्या यांनी ट्विटमध्ये केला आहे.

नार्वेकरांच्या बंगल्यावरुन किरीट सोमैय्यांचा आरोप

भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या महाविकास आघाडीमधील नेत्यांवर विविध आरोप करून चौकशीचा ससेमीरा मागे लावत आहेत. यामध्ये सोमैय्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या कोकणातील बंगल्यावरुन आरोप केला होता. मिलिंद नार्वेकर यांनी मुरुडमधील समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जागा घेतली आणि विनापरवानगी बंगला बांधला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. बंगला बांधण्याठी परवानगी न घेता दुमजली इमारत उभी केली आहे. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील झाडांची कत्तल केली असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला होता. याबाबत किरीट सोमैय्या यांनी तक्रारही दाखल केली होती.


हेही वाचा :  राणेंच्या विधानात तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी खोडून काढला नारायण राणेंचा दावा


 

First Published on: August 22, 2021 2:42 PM
Exit mobile version