मिलिंद नार्वेकर कुठे? ते तर बालाजी चरणी भक्तीत दंग

मिलिंद नार्वेकर कुठे? ते तर बालाजी चरणी भक्तीत दंग

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वियसहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा मीडियातून जोरात सुरू आहे. सध्या मिलिंद नार्वेकर कुठेत?, असा प्रश्न अनेक राजकीय नेत्यांना पडलाय. काही मीडियातून नार्वेकर हे दसरा मेळाव्याला शिंदे गटात प्रवेश करतील अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, मिलिंद नार्वेकर हे सध्या नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरात देवींचा आशीर्वाद घेत आहेत. नुकतेच त्यांनी टेंभीनाक्यावरील दुर्गेदुर्गेश्वरी त्यानंतर कोल्हापूर येथील करवीर निवासीनी महालक्ष्मी यांचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवारी नार्वेकर हे तरूपती येथील गरूड वाहन समारंभात दिसले. त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत आणि राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सुद्धा सपत्नीक देवाचे दर्शन केले. मीडियामधून जरी नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ते बालाजी चरणी भक्तीत दंग असल्याचे दिसते. नार्वेकर ट्वीटमध्ये म्हणतात मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरूमला तरूपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्या समवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.

 

First Published on: October 1, 2022 10:15 PM
Exit mobile version