मनोरुग्न व्यक्तीला पुन्हा मिळाले घर

मनोरुग्न व्यक्तीला पुन्हा मिळाले घर

मनोरुग्न व्यक्तीला पुन्हा मिळाले घर

आईवडिलांचे पाठोपाठ निधन झाल्याने जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने भ्रमिष्ट झालेल्या शिराळा (जि. सांगली) तालुक्यातील एका व्यक्तीला निवळी (ता. रत्नागिरी) येथील माहेर संस्थेमुळे पुन्हा कुटुंब मिळाले. रत्नागिरीतील ग्रामीण पोलीस ठाण्यातून माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांना निवळी गावातील ग्रामस्थांनी एक निराधार वेडसर व्यक्ती सापडल्याचे सांगितले. त्या व्यक्तीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून माहेर संस्थेत नेण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव अशोक पाटील (रा. ता. शिराळा, जि. सांगली) असे सांगितले. नंतर निपाणी, सोलापूर, मिरज या गावांची नावेही घेतली. हा धागा पकडत कांबळे यांनी आष्टा (जि. सांगली) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांना त्या व्यक्तीचे फोटो आणि त्यांनी दिलेली माहिती पाठवली. त्यांनी चौकशी करून तातडीने त्या व्यक्तीची ओळख पटवली. त्यांचे नाव महादेव बेगडे (रा. ता. शिराळा, जि. सांगली) असल्याचे सांगितले. मानसिक स्थिती बिघडल्याने ते चार दिवस बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – आई-आजीला बसवलं विमानात; पाया पडून केलं विमान सुरु

असे मिळाले मनोरुग्नाला घर

त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार महादेव बेगडेंचे वडील ऑक्टोबरमध्ये आणि आई सहा दिवसांपूर्वी हार्ट ॲटॅकने मरण पावली. एकापाठोपाठ वडील आणि आई गेल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसला. आईचे दिवसकार्य संपायच्या आतच ते मानसिक तणावाने भरकटत रत्नागिरीत आले. सुनील शिंदे महादेव यांचा भाऊ लक्ष्मण याला घेऊन माहेर संस्थेत हजर झाले. पोलिसांनी भावाचा रीतसर जबाब घेऊन आणि कागदपत्रांची खातरजमा करून महादेवला सुखरूप भावाच्या ताब्यात दिले.


हेही वाचा – चार दिवसाचा असतानाच आईने निवडणूक बैठकीला नेलं – शरद पवार

First Published on: November 26, 2018 4:53 PM
Exit mobile version