‘राज ठाकरेंना काही उद्योगच नाही’

‘राज ठाकरेंना काही उद्योगच नाही’

राज्यमंत्री रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विरोधकांनी एकत्र येत ईव्हीएम विरोधी हाक दिली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:च्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा घेत विरोधकांना एकत्र आणले आहे. शुक्रवारी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत ईव्हीएमविरोधात विरोधी पक्षांच्या मोर्चाची घोषणा केली. तसेच येत्या २१ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील घराघरात फार्म देऊन निवडणुका मतपत्रिकेवर हव्यात की नकोत, याबद्दल आम्ही मत जाणून घेणार असून ती माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले आहे की, ईव्हीएम विरोधात राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली आहे.

राज ठाकरेंकडे काही उद्योग नाही

राज ठाकरे यांच्याकडे काही उद्योग राहिला नाही. म्हणून ते देशभरातील नेत्यांच्या भेट घेत आहे. नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष द्यावे‘, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी भूमिका मांडली आहे.

तसेच ईव्हीएम मशीन हे काँग्रेसने आणले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले नाही. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांनी बोलता कामा नये. मतदानावेळी लोकांचा हात आपणहून कमळाकडे जात आहे. याला कोणी काही करू शकत नाही. त्याचप्रमाणे बारामतीत ईव्हीएम मशीन खराब नव्हते का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच ईव्हीएम मशीनचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जात असून बँलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास आमची तयारी आहे‘, असेही ते पुढे म्हणाले आहेत.


हेही वाचा – ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मुंबईत विरोधकांचा मोर्चा


 

First Published on: August 3, 2019 8:52 PM
Exit mobile version