नियोजनाच्या अभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला – आमदार देवेंद्र भुयार

नियोजनाच्या अभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला – आमदार देवेंद्र भुयार

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भुयारांनी मत दिलं नाही, अशी चर्चा पत्रकार आणि काही नेत्यांच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु मी मुख्य प्रतोदांच्या सुचनेनुसार आणि उपमुख्यमंत्रींच्या सुचनेनुसारच मतदान केलं. हे मी चर्चेमध्ये स्पष्ट केलं आहे. परंतु नियोजनाच्या अभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

नियोजनाच्या अभावामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला

खरं म्हणजे शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची रणनिती जशी पाहिजे होती, तशी झाली नाही. त्याचं नियोजन कमी पडलं आणि नियोजनचा अभाव राहीला. ऐकमेकांवर विसंबून राहिल्यामुळे त्यांना पराभव पत्कारावा लागला. पुढच्या निवडणूकीत पराभव होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीने तंतोतंत त्यांचं नियोजन केलं पाहीजे. नाहीतर पुन्हा एकदा खापर हे अपक्षांच्या नावे फोडलं जाणार, तसं होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करावं, असं भुयार म्हणाले.

विधानपरिषदेबाबत चर्चा झाली…

विधानपरिषदेबाबत सुद्दा चर्चा झाली. यामध्ये मी राऊतांना सांगितलं की, मी यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडीचा घटक होतो, कालही होतो, आजही आहे आणि उद्याही मी राहणार आहे. तसेच मी महाविकास आघाडीसोबत का आहे, हे मी त्यांना सांगितलं आहे.

मी भाजपच्या विरोधात

राऊतांनी केलेल्या अपक्ष आमदारांच्या वक्तव्याबाबत ते दिलगिरी व्यक्त करतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता भुयार म्हणाले की, साहेबांनी दिलगिरी व्यक्त करण्याचं काहीही कारण नाही. मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये. विधानपरिषदेत कोणतीही मतं फुटणार नाहीत. मुळात जी मतं महाविकास आघाडीची पूर्वीपासून आहेत. तसेच जे तळ्यात-मळ्यात नसून जी लोकं आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ती लोकं आमच्यासोबत आहेत. ती मतं हमखास आम्हाला मिळणार, तसेच आमची पूर्वीची मॅजिक फिगर सुद्धा कायम राहणार असून मी भाजपच्या विरोधात आहे, असं भुयार म्हणाले.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला. कारण भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे संजय पवारांचा पराभव झाला. मात्र, पराभव झाल्यानंतर यामध्ये काही अपक्ष आमदारांनी घोडेबाजार केल्याची नाराजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर उघडपणे व्यक्त केली.

सोलापूरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, नांदेडचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, अमरावतीच्या मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. यावेळी संजय राऊतांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केल्यामुळे देवेंद्र भुयार यांनी संजय राऊतांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.


हेही वाचा : राऊत पराभवाचं खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात, देवेंद्र भुयारांचा पलटवार


 

First Published on: June 12, 2022 8:18 PM
Exit mobile version