आमदार डॉ. राहुल आहेर कोरोनाबाधीत

आमदार डॉ. राहुल आहेर कोरोनाबाधीत

आमदार सरोज आहिरे आणि आमदार नरेंद्र दराडेंपाठोपाठ आता चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. आहेर यांची प्रकृती स्थिर आहे.
काही दिवसांपूर्वीच आ. सरोज आहिरे या कोरोनावर उपचार करुन घरी परतल्या. दहा दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर त्यांनी कामालाही सुरुवात केली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी आ. नरेंद्र दराडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता डॉ. राहुल आहेर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे डॉ. आहेर यांनी स्वत: ही बाब सोशल मीडियाव्दारे जाहीर केली.

काय म्हणाले डॉ. राहुल आहेर?

थोडी शंका आली होती म्हणून मंगळवारी (दि.२१) कोरोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आपल्या आशीर्वादने मी लवकरच बरा होईन आणि आपल्या सेवेत त्पर होईन. गेल्या आठ दिवसांत माझ्यावर प्रेम करणारे जे लोक माझ्या संपर्कात आले. त्यांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपणास काही त्रास होत असल्यास डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्यावी.

First Published on: July 22, 2020 2:36 PM
Exit mobile version