‘तो’ व्हिडीओ पाहून तर मी अवाक्च झालो…, रोहित पवारांचे शरद पवारांवरच्या व्हिडीओनंतर ट्विट

‘तो’ व्हिडीओ पाहून तर मी अवाक्च झालो…, रोहित पवारांचे शरद पवारांवरच्या व्हिडीओनंतर ट्विट

मुंबई – राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शरद पवार भारताने सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत एक ट्विट आमदार रोहीत पवार यांनी केले आहे.

ट्विटमध्ये काय? –

ट्विटमध्ये हा व्हिडिओ पाहून तर मी अवाकच झालो. काल सकाळी द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन आणि आणखी एका कार्यक्रमासाठी साहेब मुंबईवरून पुण्याला आले. कार्यक्रमानंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या व सायंकाळी ७-८ च्या सुमारास पुन्हा पुण्याहून निघून रात्री उशिरा मुंबईला पोचले, असे म्हंटले आहे.

सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा आनंद लुटला. त्यांनी हा सामना त्यांच्या नातवांसोबत अनुभवला. तिथे खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय व कन्या रेवती उपस्थित होते. सामना जिंकताच शरद पवारांनी आपल्या नातवांसोबत अनोख्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. त्यांनी आपले दोन्ही हात उंचावत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.

First Published on: August 29, 2022 8:45 PM
Exit mobile version