आमदार अनिल भोसले यांना आज कोर्टात हजर करणार, ७१ कोटींच्या बॅंक घोटाळा प्रकरणी अटक

आमदार अनिल भोसले यांना आज कोर्टात हजर करणार, ७१ कोटींच्या बॅंक घोटाळा प्रकरणी अटक

अनिल भोसले यांना आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील घोटाळा प्रकरणात बॅंकेचे संचालक असलेल्या आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ जणांना गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. तब्बल ७१ कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवत ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

यांच्यावरही गुन्हे दाखल

बॅंकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस व्ही जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बॅंकेचे अधिकारी शैलेस भोसले यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

म्हणून झाली अटक

भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता त्यामध्ये ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले होते. म्हणूनच शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बॅकेचे संचालक असलेले आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनदी लेखापाल (सीए) योगेश लकडे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. ऑडिट करताना या नोंदी बनावट असल्याचे आढळून आले होते. बँकेच्या एकूण १४ शाखा असून, एकूण १६ हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत १२ कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

First Published on: February 26, 2020 8:04 AM
Exit mobile version