मलिक-देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, विधान परिषद मतदानासाठी दोन्ही नेत्यांचा अर्ज

मलिक-देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, विधान परिषद मतदानासाठी दोन्ही नेत्यांचा अर्ज

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अर्जावर १६ जून २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये मतादनाची परवानगी दिली नव्हती यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. हायकोर्टात या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही नेते तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता.

विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्यात यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. दोघांच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. परंतु आजच्या कोर्टाच्या कामकाजात सुनावणी होईल असे वाटत नाही यामुळे सुनावणी उद्यावर जाणार आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी सकाळीच घेण्यात यावे असे निर्देश न्यायमूर्ती एन. जमादार यांनी दिले आहेत.

राज्यसभा मतदानासाठी परवानगी फेटाळली

नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी जामीन देण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये ईडीने जोरदार विरोध केला होता. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असे ईडीने म्हटलं होते. सुनावणीदरम्यान नवाब मलिकांचा अर्ज फेटाळण्यात आला. तर राज्यसभा निवडणुकीमध्ये परवानगी देण्यात यावी यासाठी नवाब मलिक-अनिल देशमुख यांनी मुदतीपूर्वीच याचिका केली आहे. दरम्यान आता राज्यसभेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना परवानगी मिळणार का? याकडे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : अयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, इथे कुठलाही राजकीय विषय नाही : आदित्य ठाकरे

First Published on: June 15, 2022 12:36 PM
Exit mobile version