घरदेश-विदेशअयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, इथे कुठलाही राजकीय विषय नाही : आदित्य ठाकरे

अयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, इथे कुठलाही राजकीय विषय नाही : आदित्य ठाकरे

Subscribe

ते पुढे म्हणाले, इथे रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलो आहोत. देवळात गेल्यानंतर मी मागणी मागण्यापेक्षा आशीर्वाद घेत असतो. देवाकडे ऋण व्यक्त करत असतो. जी काही आतापर्यंत सेवा करण्याची संधी दिलेली आहे, तिच्यासाठी आम्ही धन्यवाद बोलत असतो.

लखनऊ: आदित्य ठाकरे लखनऊमध्ये पोहोचले असून, त्यांच्या गाड्यांचा ताफा अयोध्येकडे रवाना झाला आहे. फुलांचा वर्षाव करत आणि ढोलताशांच्या गजरात शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलंय. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनीही लखनऊमध्ये उतरल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. आज आम्ही अयोध्येत दर्शन घ्यायला आलो आहोत, इथे कुठलाही राजकीय विषय नाही. हा विषय आमच्या स्वतःच्या आस्थेचा असल्याचंही आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

ते पुढे म्हणाले, इथे रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलो आहोत. देवळात गेल्यानंतर मी मागणी मागण्यापेक्षा आशीर्वाद घेत असतो. देवाकडे ऋण व्यक्त करत असतो. जी काही आतापर्यंत सेवा करण्याची संधी दिलेली आहे, तिच्यासाठी आम्ही धन्यवाद बोलत असतो. पुढे जे काही आमच्याकडून कार्य घडायचं असेल देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी किंवा राज्यासाठी असेल, जे काही कार्य असेल ते लोकांसाठी चांगलं होऊ दे, एवढंच आम्ही मागत असतो, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.

- Advertisement -

महाराष्ट्र सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत आगमन होण्यापूर्वी त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शिवसैनिक मंगळवारी रात्री उशिरा अयोध्येत पोहोचले होते. रात्री उशिरा विशेष ट्रेनने सुमारे 1200 शिवसैनिकांचा ताफा अयोध्या स्थानकावर दाखल झाला होता. तेथून त्यांना थेट नियुक्त धर्मशाळांमध्ये नेण्यात आले आणि आता त्यांनी आपल्या नेत्याचे जंगी स्वागत सुद्धा केले आहे. आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी अयोध्येत पोहोचणार असून, ते प्रथम इस्कॉन मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर थेट रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील आणि संध्याकाळी शरयू नदीकाठी आरतीलाही उपस्थित राहतील.

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या रद्द झाल्यानंतर आता शिवसेना आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच त्यांच्या नेत्याच्या आगमनापूर्वीच मोठ्या संख्येने समर्थक उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. रात्री उशिरा दोन विशेष गाड्यांमधून अयोध्या स्थानकावर उतरताच दोन हजारांहून अधिक शिवसैनिकांनी जय श्रीरामचा नारा दिला. शिवसैनिक शरयूमध्ये स्नान करून रामलल्लासह विविध मंदिरांमध्ये पूजा करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः शिवसेनेचा ‘हा’ नेता विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला राहणार हजर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार चर्चा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -