16 एप्रिलला राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवार १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. तसंच, सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळावाच्या भाषणात ‘मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुण्याचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यांच्या वक्तव्याला विरोध केला होता. मात्र आता पुण्यातच राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान चालीसा पठण केलं जाणार असल्यानं आता वसंत मोरे याला पाठींबा देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंच्या मशिदींवरील वक्तव्यानंतर मनसेच्या अनेक पुण्यातील काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर आता मनसे राज्य सचिव इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेला धक्के बसत आहेत. राज ठाकरेंनी आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे शेख यांनी राजीनामा दिला आहे. तसंच, राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी दिला आहे. परंतु या भूमिकेमुळे मुस्लिम पदाधिकारी नाराज झाले आहेत.

राज ठाकरेंनी उत्तर सभेत ३ मेनंतर मनसे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे म्हटलं आहे. भूमिका कायम ठेवल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र सुरु झालं आहे. मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुण्याचे नगरसवेक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केल्यामुळं त्यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर हे पद पुण्याचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे सोपवण्यात आली.


हेही वाचा – मनसेत राजीनामा सत्र सुरुच, आणखी एका मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

First Published on: April 14, 2022 11:12 PM
Exit mobile version