मनसे ही शिवसेनेची बी टीम, भाजपच्याच नेत्याकडून मोठा आरोप

मनसे ही शिवसेनेची बी टीम, भाजपच्याच नेत्याकडून मोठा आरोप

मुंबई – मनसे ही शिवसेनेची बी टीम आहे. आम्हाला गरज पडली तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. शिवसेना पारंपरिक मित्र आहे. शिवसेनेसोबत जाणं कधीही योग्यच आहे, असं मोठं विधान भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. (MNS is b team of shivsena, sanjay kakde allegation)

हेही वाचा आदित्य ठाकरेंकडूनही मध्यावधीचे संकेत; सरकार कोसळणारच, बाळापूरच्या भाषणात ठाम दावा

भाजपा-मनसे युतीची आम्हाला गरज नाही. पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर माझा या युतीला विरोध असणार आहे. ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही. मोदींवरील टीकेबाबत राज ठाकरे यांनी आधी उत्तर द्यावं, मगच पुढे बोलू , असं संजय काकडे म्हणाले.

हेही वाचा – आठ दिवसांनी शरद पवार यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलले असल्याचं चित्र आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाविरोधी भूमिका घेत प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, आता त्यांनी भाजापाचं उघड उघड समर्थन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे- भाजपा युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या युतीला भाजपाच्या अनेक नेत्यांनी समर्थन दिलं आहे. मात्र, संजय काकडे यांनी या संभाव्य युतीला विरोध दर्शवला आहे.

First Published on: November 7, 2022 2:33 PM
Exit mobile version