मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी

MNS Konkan divisional general secretary Vaibhav Khedevkar has been threatened with death

मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. मशिदींवरील भोंग उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे हा धमकीचा फोन आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धमकी देणार फोन परदेशी क्रमांकावरून आल्याचे खेडेकर यांनी सांगितले.

वैभव खेडेकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणात महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचे वैभव खेडेकर यांचे म्हणणे आहे. वैभव खेडकर या फोनबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत.

वैभव खेडेकर मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस आहेत. यापूर्वी अनेक वेळा वैभव खेडेकर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. एखादे आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलने दिलेला झटका यामुळे वैभव खेडकर कायम चर्चेत असतात.

वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नियमबाह्य पद्धतीने देयके प्रदान करणे, मान्यता नसतानाही खासगी वाहनात सरकारी खर्चाने इंधन भरणे, इतिवृत्तांत बदल करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.

First Published on: May 5, 2022 12:37 PM
Exit mobile version