महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा स्थगित करा, मनसेची मागणी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा ऑनलाईन घ्या अन्यथा स्थगित करा, मनसेची मागणी

राज्यातील कोरोना परिस्थिती अजूनही आटोक्यात आली नाही आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पसरतो आहे. यामध्ये राज्य सरकारने १० जून पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विभागाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायची आहे. यावरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात किंवा शक्य नसल्यास स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. या परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या धोक्याला समोरे जावे लागेल असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत राज्य सरकारला विज्ञान विभागाची परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा काही काळासाठी स्थगित करावी अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात या विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या पालकांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करुन सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण केल्यास या परीक्षा घ्याव्यात अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

“राज्य सरकारने १० जून पासून नियोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान परीक्षा या आत्ता ची परिस्थिती बघता ऑनलाइन घ्याव्यात अथवा काही काळासाठी स्थगित कराव्यात. या परीक्षा आता घेतल्यास व त्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धोका संभवतो. सरकारने या परीक्षा ऑनलाइन घेतल्यास सर्वच गोष्टी निकाली लागतील व विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होणार नाही. ते शक्य नसल्यास निदान त्या काही काळा पुरत्या स्थगित कराव्यात व त्या दरम्यान या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला जोर दयावा” आशा आशयाचे ट्विट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे नियमानुसार नाही

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विदयार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत. अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केंद्रिय नियामक मंडळालाही ते मान्य नाही शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

First Published on: June 6, 2021 7:50 PM
Exit mobile version