निवडणूक असणाऱ्या राज्यातील नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर, निर्बंध घालण्याची मनसेची मागणी

निवडणूक असणाऱ्या राज्यातील नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर, निर्बंध घालण्याची मनसेची मागणी

निवडणूक असणाऱ्या राज्यातील नागरिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर, निर्बंध घालण्याची मनसेची मागणी

निवडणुका असणाऱ्या राज्यातील नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून राज्यात येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध घाला, या राज्यात निवडणुकांसाठी सगळे नियम झुगारल्याने तेथे मोठ्या गर्दीने सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरु शकतात. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील दुकाने, हॉटेल, मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांची प्रत्येक स्थानकावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. परंतु निवडणूक असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कडक निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. अशा आशयाचे ट्विट करत नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

सध्या देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पद्दुचेरी या राज्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात सभा, बैठका घेतल्या आहेत. या सभांना हजारो लोकांनी गर्दी केली होती. आता या राज्यात कोरोनाचे संकट दिसत नाही आहे. परंतु निवडणूका झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. येथील नागरिक मुंबईत परतल्यानंतर पुन्हा मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरु लागेल. त्यामुळे या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करा आणि कडक निर्बंध घाला अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

First Published on: April 9, 2021 12:50 PM
Exit mobile version