मनसेच्या नेत्यावर पनवेलमध्ये जीवघेणा हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

मनसेच्या नेत्यावर पनवेलमध्ये जीवघेणा हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

पनवेलचे मनसे शहर उपाध्यक्ष मनोज कोठारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर कोठारी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे पनवेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (mns leader manoj kothari was assaulted in panvel)

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी.के. ढाबा येथे 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता मनोज कोठारी आणि त्यांचा मित्र जेवण आणण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेलबाहेर ओळखीचे आरोपी खाडे आणि त्याचे दोन ते तीन साथीदार उभे होते. मनोज कोठारी बाहेर येताच खाडे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गाडीत असलेल्या हॉकी स्टिकने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कोठारी यांच्या डोक्याला आणि हाताला जबर मार लागला आहे.

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी खाडे आणि त्याच्या साथीदारांवर 323/326/506/560 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मनोज कोठारी यांच्या सांगण्यानुसार आरोपी हा मनसेचाच कार्यकर्ता होता. त्याला उपशहर अध्यक्षपद हवे होते. याबाबत त्याने आपल्याकडे अगोदरही विचारणा केली होती. मात्र हे पद कामाच्या जीवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले असल्याचे त्याला सांगितले. मात्र पद आपल्याला मिळाले नाही म्हणून त्याच्या मनात राग होता. त्याच रागातून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा रे; अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून मनसेच्या गजानन काळेंचे ट्वीट

First Published on: November 6, 2022 2:29 PM
Exit mobile version