मनसेने कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला झालेले फायदे सांगितले

मनसेने कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला झालेले फायदे सांगितले

शिवतीर्थावर मनसे मोठं शक्तिप्रदर्शन करणार; मुंबईतील मनसेची बैठक संपली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण मंगळवारी चांगलंच तापलं होत. नारायण राणेंविरोधात राज्यातील बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाली, तर काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा वाद पेटला. अखेर दुपारी मुख्यमंत्र्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काल रात्री महाड न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे नारायण राणे यांची सुटका करण्यात आली. राज्यातील कालच्या या संपूर्ण घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपरोधिक ट्वीट केलं आहे. त्यांनी कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला काय फायदे झाले? हे सांगितले आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेना आणि पत्रकारांवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं. घरचंच आंदोलन होत त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पत्रकार विसरले. आता आपण कोरोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास.’

 

काल देखील संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि पत्रकारांवर निशाणा साधत ट्वीट केलं होत. ते म्हणाले की, ‘आज सकाळ पासून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था “फाट्यावर”मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टन्सिंग नाही गर्दी च गर्दी अस असून “कोरोना हृदय सम्राट”गप्प का? आणि हो सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत.’


हेही वाचा – ‘करारा जवाब मिलेगा’ राणेंना जामीनानंतरचे नितेशचे ट्विट ठरतेय चर्चेचा विषय


 

First Published on: August 25, 2021 10:47 AM
Exit mobile version