शिवाजी पार्कची रोषणाई महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा; मनसेचा सरकारला टोला

शिवाजी पार्कची रोषणाई महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा; मनसेचा सरकारला टोला

शिवाजी पार्कची रोषणाई महिन्याच्या 'कलेक्शन'मधून करा; मनसेचा सरकारला टोला

शिवाजी पार्कच्या रोषणाईवरुन मनसे आणि सरकारमध्ये श्रेयवादाचा मुद्दा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून शिवाजी पार्कवर विद्युत दिवे आणि इतर सुशोभिकरणासाठी सव्वा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. यावरुन आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कला विद्युत रोषणाई करण्याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये, यासाठी घाट घातला जात आहे. खरोखरच करायचं असेल, तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या ‘कलेक्शन’मधून करा, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर निशाणा साधला आहे. “दर वर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जातोय. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होतो का? आणि खरोखरच करायचं आहे तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या “collection” मधून करा,” असा टोला लगावत शुभेच्छा दिल्या.

दर वर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क ला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत…

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Sunday, 21 March 2021

First Published on: March 22, 2021 11:08 AM
Exit mobile version