‘गैरसमज काही लोक करून देतात’; मुस्लिम मनसैनिकांच्या नाराजीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

‘गैरसमज काही लोक करून देतात’; मुस्लिम मनसैनिकांच्या नाराजीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मनसे मेळाव्यामध्ये प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडत मशीदीवरील भोंग्यांना विरोध केला. ‘मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील अनेक भागांत मनसैनिकांनी मशिदींसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावला. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर मनसेतील अनेक मुस्लिम नेते नाराज झाले आहेत. तरी काही नेत्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली. यावर आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुस्लिम मनसैनिकांचा गैरसमज झाला असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा त्यांच्यासमोर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल’ राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राज्यातील मुस्लिम मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे’, असं म्हटलं. तसंच, ‘बऱ्याचदा गैरसमज काही लोक करून देतात त्याच्यामुळं तो झाला असल्याची शक्यता आहे. पण काहीच हरकत नाही आमचे पदाधिकारी बोलतील आणि त्यातून व्यवस्थित मार्ग निघेल’ असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

पुण्यातील मनसेच्या वॉर्ड क्रमांक ८४ शाखेचे अध्यक्ष माजिद अमीन शेख यांनी पत्र लिहित पदाचा राजीनामा दिला. याबाबतचं पत्र त्यांनी पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांना पाठवलं. ”मी माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक ८४ शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक १८ आपणास या पत्राद्वारे कळवत आहे कि, मागील काही दिवसात पक्षात विकास, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे मुद्दे सोडून जात – धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी माजिद अमीन शेख कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या पदाचा राजीनामा स्वीकारून याची पोहोच द्यावी हि विनंती”, असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं.

जातीजातीत ज्यांनी भांडण लावली, त्यांनी आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही

दरम्यान, राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही राज ठाकरेंवर सडकून टीका केली. ‘राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस पेट्रोल डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत’, अशा शब्दांत टीका केली. यावरही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – काँग्रेसमधील १५ नाराज आमदार सोनिया गांधींना भेटणार, पक्षातील मंत्र्यांची करणार तक्रार

First Published on: April 5, 2022 9:44 AM
Exit mobile version