घरताज्या घडामोडीकाँग्रेसमधील १५ नाराज आमदार सोनिया गांधींना भेटणार, पक्षातील मंत्र्यांची करणार तक्रार

काँग्रेसमधील १५ नाराज आमदार सोनिया गांधींना भेटणार, पक्षातील मंत्र्यांची करणार तक्रार

Subscribe

महाविकास आघाडीमध्ये नाराजी आणि अस्थिरता असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन घटक पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारमध्ये काँग्रेसपक्षातील आमदार नाराज आहे. आपल्याच मंत्र्यांमुळे काम होत नसल्याची तक्रार आमदारांची आहे. यामुळे हे १५ आमदार सोमवारी दिल्लीत दाखल झाले असून मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी आमदारांनी राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. आमदारांनी यापूर्वीसुद्धा सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीच्या वेळेसाठी मागणी केली होती.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला फारसे महत्त्व नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांमुळे पक्षातील आमदारांची कामे होत नाहीत अशी तक्रार आमदारांनी केली आहे. प्रशिक्षणासाठी आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत यावेळीच सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातही आमदारांचा नाराजीचा सूर आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कमालीची अस्थिरता असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

आमदारांना सोनिया गांधींच्या भेटीची प्रतीक्षा

दिल्लीत दाखल झालेल्या आमदारांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामध्ये सोनिया गांधींच्या भेटीची अद्यापही आमदारांना प्रतीक्षा आहे. नाराज आमदार आणि सोनिया गांधी यांची आज किंवा उद्या भेट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या मंत्र्यांची करणार तक्रार

काँग्रेसचे नाराज आमदार महाविकास आघाडी सराकरमधील मंत्री आणि काँग्रेसच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. आपले मंत्री अनेक वर्षांपासून सत्तेत आहेत. परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांची कामं वेळेवर होत नाही. पक्षातील मंत्रीच कामांसाठी टाळाटाळ करत असल्यामुळे आमदार नाराज झाले आहेत. तसेच सरकारमध्ये विविध महामंडळे आणि शासकीय समितींवर नियुक्ती अद्याप उर्वरित असून त्या लवकर पूर्ण कराव्यात अशी तक्रार आमदार पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्षांमध्ये संभ्रमाचे वातवरण आहे. सुरुवातीलाही काँग्रेसच्या आमदार आणि मंत्र्यांनी महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याचे सांगितले होते. यानंतर शिवसेनेच्या आमदारांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा : मविआच्या भ्रष्टाचाराची 20-20 सुरू सरकारला बेवड्यांची चिंता

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -