कंत्राटी कामगारांसाठी मनसेकडून बेस्ट समिती अध्यक्षांची भेट

कंत्राटी कामगारांसाठी मनसेकडून बेस्ट समिती अध्यक्षांची भेट

कंत्राटी कामगारांसाठी मनसेकडून बेस्ट समिती अध्यक्षांची भेट

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून बेस्टमधील कर्मचार्‍यांनी नागरिकांना सेवा पुरवली. यामध्ये बेस्टमधील कंत्राटी कामगारही आघाडीवर होते. मात्र या कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या तुलनेत कमी वेतन व हीन वागणूक मिळत आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ व अनेक इतर सुविधांपासून कंत्राटी कामगारांना वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या मागणीसाठी २४ ऑगस्टला मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि चिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वातील मनसेच्या शिष्टमंडळाने शिवसेना नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांची कुलाबा येथील बेस्ट भवनात भेट घेतली.

बेस्ट उपक्रमात असलेल्या कंत्राटी कामगारांना कायम कामगारांच्या तुलनेत कमी वेतन व हीन वागणूक मिळत आहे. तसेच वार्षिक वेतनवाढ व अनेक इतर सुविधांपासून कंत्राटी कामगारांना वंचित ठेवण्यात येत आहे. कोरोनामध्ये जीवाची बाजी लावून काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना समान वेतन व चांगली वागणूक देण्यात यावी अशी विनंती यावेळी धुरी व नाईक यांनी केली.

बेस्ट उपक्रमामध्ये मे. एम.पी. ग्रुप (पुणे), मे.मारुती ट्रॅव्हल्स (अहमदाबाद), मे. हंसा सिटीबस (नागपूर) या कंपन्यांनामार्फत कंत्राटी कामगार व बसेस पुरविल्या जात आहेत. या बसेसवर कंडक्टर म्हणून उपक्रमातील कायम कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. मात्र बेस्ट प्रशासनाला कंडक्टर पुरवण्याचे काम मे.मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.

बेस्टचे स्वत:चे कर्मचारी कंडक्टर असताना कंत्राटी पद्धतीने का घेण्यात येत आहेत असा प्रश्न उपस्थित करत हे टेंडर तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी मनसेने केली. ज्या अधिकार्‍यांनी हे टेंडर बनवले त्याच अधिकार्‍याने बेस्टची नोकरी सोडून टेंडर मिळालेल्या कंपनीची नोकरी स्वीकारली आहे, अशी माहिती मिळाल्याने कुंपणच शेत खात असल्याचा आरोप केतन नाईक यांनी यावेळी केला.

First Published on: August 25, 2021 11:07 PM
Exit mobile version