महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मनसेने केली पोस्टरबाजी

महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मनसेने केली पोस्टरबाजी

महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मनसेने केली पोस्टरबाजी

बॉलिवूडचे शेहनशाह महानायक अमिताभ बच्चन  जुहूमधील संत ज्ञानेश्वर मार्गावर स्थीत ‘प्रतिक्षा’ बंगल्या बाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे.  2017 साली रस्ता रुंदीकरण मोहिमे अंतरर्गत अमिताभ बच्चन यांच्यासह त्या मार्गावर राहणाऱ्या इतर बंगले मालकांना त्या भूखंडाचा काहीसा भाग रस्ते रुंदीकरणासाठी देण्याकरीता पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नोटीस मिळताच त्या मार्गीकेवर राहणाऱ्या मालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेला त्यांनी कारवाई करण्यास सहकार्य केलं होतं. मात्र बीग बी अमिताभ बच्चन यांनी अद्याप या नोटीसवर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाहीये. याचदरम्यान मनसेचे MNS विभागीय अध्यक्ष मनिष धुरी यांनी बीग बी यांच्या बंगल्याबाहेर पोस्टरबाजी करत. “अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावं,मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच प्रतिक्षा.” अनेक लोकांनी मोठ-मोठी पोस्टर हातात धरुण अमिताभ बच्चन यांच्या घरावर देखील कारवाई करा अशी घोषणाबाजी केली आहे.(mns poster on amitabh bachchan pratiksha bungalow for road winding work)

काय आहे संपुर्ण प्रकरण

२०१९ साली अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्याच्या अगदी बाजूलाच असलेली इमारतीची भिंत पाडण्यात आली होती. याचदरम्यान अमिताभ यांच्या घरावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावर नाराजी दर्शवत इमारतीत राहणाऱ्या लोकांनी कोर्टात धाव घेत व्हिआयपी लोकांच्या घरावर कारवाई होत नाही असे वक्तव्य केलं होत. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिका रस्ता रुंदीकरण करत आहे. त्यासाठी या भागातील काही बंगल्यांचा भाग महापालिकेने ताब्यात घेतला आहे.या भागातील काँग्रेस नगरसेवक ट्युलिप मिरांडा यांनी के-पश्चिम वॉर्डकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. महापालिका जाणीवपूर्वक बच्चन यांची मालमत्ता ताब्यात घ्यायला विलंब लावतेय, असा आरोप त्यांनी केला होता. “लागून असलेल्या अन्य मालमत्ता ताब्यात घेतल्या आणि फक्त हा भूखंड सोडला आहे. शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे हा विषय पाठवून महापालिका वेळकाढूपणा करतेय. महापालिकेने हा भूखंड ताब्यात घेतला नाही, तर आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करु” असा इशारा मिरांडा यांनी दिला होता.



हे हि वाचा – परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या; सरकारने ACB ला दिले तपासाचे आदेश



 

First Published on: July 15, 2021 12:10 PM
Exit mobile version