आम्हाला पोलीस व्हॅनसमोर उभे करा आणि.., राहुल गांधींविरोधात मनसेचं प्रीप्लॅन आंदोलन

आम्हाला पोलीस व्हॅनसमोर उभे करा आणि.., राहुल गांधींविरोधात मनसेचं प्रीप्लॅन आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. काँग्रेससह महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मात्र, या यात्रेला गालबोट लागलं ते म्हणजे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर.., सावरकरांच्या वक्तव्यानंतर मनसे, शिंदे गट आणि भाजप राहुल गांधींविरोधात अधिक आक्रमक झाले होते. शेगावमधील राहुल गांधींच्या सभेत मनसेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मनसेकडून आंदोलनं करण्यात आली. मात्र, मनसेने केलेल्या आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांच्या वक्तव्यानंतर मनसेचे कार्यकर्ते संतापले होते. त्यांनी शेगावची सभा उधळून लावण्याची धमकीही दिली होती. परंतु ते शेगावकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यानंतर तिथेच त्यांनी आंदोलन केलं. परंतु एक व्यक्ती पोलिसांसोबत प्रीप्लॅन बनवताना व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येत आहे.

पोलिसांशी बोलताना हा व्यक्ती सांगतोय की, आम्हाला फक्त पोलीस व्हॅनसमोर उभे करा. चहासुद्धा पाजू नका, प्रेसवाले फोटो घेतील, मग आमचं काम होईल, असा दावा हा व्हिडीओ शेअर होताना करण्यात येत आहे.


हेही वाचा : मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी कॅगची टीम


 

First Published on: November 22, 2022 8:10 PM
Exit mobile version