…तर ओवैसींना माफी मागायला का सांगत नाही? नुपूर शर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंचा ओवैसी बंधूंवर हल्लाबोल

…तर ओवैसींना माफी मागायला का सांगत नाही? नुपूर शर्मा प्रकरणावरून राज ठाकरेंचा ओवैसी बंधूंवर हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा राजकारणात अॅटिव्ह मोडमध्ये आले आहे. आज राज ठाकरेंनी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत मार्गदर्शन केले, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी बंधुंवर निशाणा साधला आहे.

ओवैसी हे दोन हरामखोर भाऊ, त्यातील एक जण आमच्या हिंदू देवीदेवतांबद्दल बोलतो, क्या नाम है उनके गणपती… लक्ष्मी… ये… वो… वैगरे वैगरे… शेवटी काय बोलला तो… कैसे कैसे मनहूस नाम रखते है… आमच्या देवी देवतांची नावं काय मनहूस.. त्याला या देशात कोणी माफी मागण्यास सांगणार नाही. या देशात चांगले मुस्लमान होते आणि आहोत. त्यांच्यासारखे दळींद्री नाहीत. अशा शब्दात राज ठाकरेंनी ओवैसी बंधुंवर निशाणा साधला आहे. तसेच कोणतेही सरकार ओवैसी बंधुंना चाप लावण्यास तयार नाही. तसेच त्यांच्या जीभेवर कुठली बंधनं आणण्यास तयार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात सत्तेचा बाजार उभा केला आहे. मात्र महाराष्ट्रासाठी काही नाही केलं. नुपूर शर्मा बोलल्या, त्यानंतर त्यांना काढून काय टाकलं, सर्वांनी माफी काय मागितली, मी नुपूर शर्मांचे समर्थन केले. त्या स्वत;च्या मनातलं बोलत नव्हत्या, झाकीर नाईकच्या मुलाखती बघा, झाकीर नाईक हा तर मुस्लमान आहे, झाकीर नाईकच्या एका मुलाखतीमध्ये त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलल्या. झाकीर नाईकच्या बाबत काही नाही झालं त्याबद्दल कोण काही बोलल नाही, त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा… त्याचं बोलणं अद्याप सुरुचं आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे.


 

First Published on: August 23, 2022 2:20 PM
Exit mobile version