मनसे वाढत चालल्याने विरोधकांना त्रास, राज ठाकरेंचा दावा

मनसे वाढत चालल्याने विरोधकांना त्रास, राज ठाकरेंचा दावा

काही लोकं पक्षासाठी वाहत गेलेले असतात. त्यांना दुसरा पक्ष वाढताना कसनुस होतं, विरोधकांना त्याचा त्रास होणं स्वाभाविक आहे, असा दावा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंच्या हस्ते नागपूरमधील 273 नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. राज ठाकरे 3 महिन्यातून दुसऱ्यांदा नागपूर दौऱ्यावर गेले आहेत.

या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटी फिरवेल, असा इशारा पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिला आहे.

मागील नागपूर दौऱ्यानंतर बातम्या छापण्यात आल्या की, मनसेला पदाधिकारी मिळत नाहीत, त्यावेळी अशा बातम्या टाकल्या होत्या त्यांच्या डोळ्यात अंजन घालव आणि जी माणसं सापडत नाहीत ती माणसं कशी सापडली हे त्यांच्या नजरेला दाखवावं म्हणून ही पत्र तुमच्यासमोर वाटली असल्याचे राज ठाकरेंनी नमूद केले,

पूर्वीच्या काळात विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, नंतर भाजपचा झाला, या प्रत्येक फेजेस असतात, काही वेळाने दुसरी माणसं येत असतात कारण असलेल्या माणसांना लोकंही कंटाळतात. सारखे तेच तेच चेहरे येत आहेत पण ते काही सोडत नाहीत. आज जे शाखाध्यक्ष झाले त्यांना अनेक जण म्हणतील, हे पोट्ट काय करणार?का दिवसांनी हेच पोट्ट नंतर तुमच्यावर वरवंटा फिरवणार, असा एकप्रकारे इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.

काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे, असं म्हणत बहुतेक पत्रकार नागपूर विदर्भामधील मनसेला पुढे होण्यासाठी पाठींबा नाही पण एकप्रकारे प्रोत्साहन देत आहे, त्यांचे राज ठाकरेंनी मनापासून आभार मानले आहेत.

जो जो राजकीय पक्ष आत्तापर्यंत मोठा झाला आहे. त्यांच्याबद्दल बहुदा महात्मा गांधीचे हे एक चांगलं वाक्य आहे की, सुरुवातीला काम करत असताना समोरचे विरोधक हसतात, मग कालांतराने ते तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. मग कालांतराने त्यांच्या लक्षात येतं त्यांच्याशी लढलं पाहिजे. मग ते आपल्याशी लढायला येतात आणि मग आपण जिंकतो, म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एकप्रकारे नवीन ऊर्जा दिली आहे.

ज्यांना हसायचं आहे त्यांनी हसाव, कालांतराने त्यांच्या लक्षात येईल, अरे हे खुपचं वाढले, मोठे झाले. त्यांचे नगरसेवक, खासदार आमदार निवडून यायला लागले. प्रत्येक राजकीय पक्ष याच परिस्थितीतून गेला आहे, असही राज ठाकरे म्हणाले.

मनसैनिकांना जिवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागले

कार्यकर्त्यांचा मनात आग असली पाहिजे. यश येईल पराभव होईल, पराभवाने खचून चालणार नाही. पराभव कोणाचा नाही झाला, जगात अनेक दिग्गजांचे पराभव झाले आहेत. आज भाजपचे आमदार खासदार आहेत. १९२५ साली आरएसएसची स्थापना झाली आणि त्यांनी १९५२ साली जनसंघ नावाचा पक्ष स्थापन केला, पुढे आणीबाणी लागू झाली. त्यानंतर मोरारजी देसाईंचे राज्य आले. त्यांची सत्ता गेली आणि इंदिरा पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर १९८० ला जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. १९९६ ला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, भाजपाला खऱ्या अर्थाने बहूमत हे २०१४ साली मिळाले. १९५२ ते २०१४ कितीही मतभेद असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना हे यश मिळाले आहे. काँग्रेसचा संघर्षही मोठा आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेनेच्या हातात १९९५ मध्ये सत्ता आली. १९६६ ते १९९५ हा संघर्षाचा काळ होता. मात्र आजचं राजकारण बघितलं, तर सर्वांना लगेच यश हवं आहे. पण त्यासाठी जिवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागले

 


धर्मांतराच्या घटनांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देणार, शंभुराज देसाईंची माहिती

First Published on: December 23, 2022 1:44 PM
Exit mobile version