महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह १२ मंत्र्यांचे मोदींनी घेतले राजीनामे, कामाचा ठसा उमटवण्यात मंत्री फेल

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह १२ मंत्र्यांचे मोदींनी घेतले राजीनामे, कामाचा ठसा उमटवण्यात मंत्री फेल

महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह १२ मंत्र्यांचे मोदींनी घेतले राजीनामे, कामाचा ठसा उमटवण्यात मंत्री फेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात उलथापालथ करण्यात आले आहे. मोदी मंत्रिमंडळ विस्तार करत असल्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांसह एकूण १२ मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. नव्या ४३ नेत्यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या नव्या केंद्रीय मंत्र्यांची गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु मागील २ वर्षांत कोरोनाच्या कालावधीत झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला गेलाय यामध्ये ज्या मंत्र्यांच्या कारभारामुळे सरकारवर टीका करण्यात आल्या त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

देशात कोरोनाची भयावह परिस्थिती झाल्यावर योग्य उपाययोजना झाल्या नसल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी टीकेचे धनी व्हायला लागले होते. हर्षवर्धन यांच्या कारभारामुळे सरकारला टीका झेलाव्या लागले असल्याचे कारण देत हर्षवर्धन यांना राजीना देण्यास सांगितले होते. तर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आणलेल्या नव्या आयटी कायद्यामुळे ट्विटर, फेसबुकमध्ये चांगलाच वाद उफाळला होता यामुळे भाजप मंत्री रवीशंकर प्रसाद वादाच्या सापडले होते यामुळे त्यांचाही राजीनामा घेतला असल्याचे कळते आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री, मानव संसाधन मंत्री म्हणून रमेश पोखरीयाल निशंक यांची कागिरी म्हणावी तितकी प्रभावी झाली नाही. शैक्षणिक क्षेत्रात पालकांच्या मनं जिंकता आली नसल्यामुळे ते टीकेचे धनी झाले होते. मागील १ महिन्यापासू ते कोरोना संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते.

मोदी सरकार आल्यापासून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावरुन वादविवाद सुरु होते त्यातच कोरोना काळात अनेकांनी स्थलातरण केल्यामुळे मोदी सरकार अडचणीत आले होते. या सर्व लोकांना कामगार उपलब्ध नसल्यामुळे मोदी सरकारवर टीका करण्यात येत होती यामुळेच कामगार मंत्री संतोष गंगवार यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

या मंत्र्यांचा घेतला राजीनामा

कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद

सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियल निशंक

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार

राज्यमंत्री बाबुल सुप्रियो

मंत्री रतन लाल कटारीया

राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी

मंत्री संजय धोत्रे

मंत्री सुश्री देबश्री चौधरी

कृषीमंत्री डि.व्ही. सदानंद गौडा

First Published on: July 7, 2021 10:22 PM
Exit mobile version