Video : आर्थिक वादातून पुण्यात राडा; हाणामारी सीसीटीव्हीत कैद

Video : आर्थिक वादातून पुण्यात राडा; हाणामारी सीसीटीव्हीत कैद

आर्थिक वादातून पुण्यात राडा

पुण्यातील एका दुकानात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. आर्थिक वादाच्या कारणातून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. त्याचे काही सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रॉड आणि तलवारीने झालेल्या मारहाण या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे.

नेमके काय घडले?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. भर दिवसा एखाद्या दुकानात शिरून तलावर आणि रॉडने मारहाण करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्यामुळे पुण्यातील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या व्हिडिओत काही गुंड अचानक व्यावसायिकाच्या दुकानात घुसतात. काही वेळ बातचित केल्यानंतर काही गुंड अचानक तलवार आणि रॉड घेऊन येताना दिसतात. त्यानंतर, दुकानात असलेल्या लोकांवर हल्ला करताना ही दिसत आहे.


हेही वाचा – पतीनेच केली पत्नीची हत्या; पायातील पैजणांनी उघडकीस आला गुन्हा


 

First Published on: October 16, 2019 8:56 PM
Exit mobile version