घरमुंबईपतीनेच केली पत्नीची हत्या; पायातील पैजणांनी उघडकीस आला गुन्हा

पतीनेच केली पत्नीची हत्या; पायातील पैजणांनी उघडकीस आला गुन्हा

Subscribe

पायातील पैजणांनी पाच महिन्यानंतर गुन्हा उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पाच महिन्यांपूर्वी एका महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात रामनगर पोलिसांना यश आलं आहे. तिच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून, त्या महिलेच्या पायातील पैंजणमुळेच हा गुन्हा उघडकीस आला आहे. मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तामिळनाडूतुन पतीला अटक

२९ मे रोजी कोपर – वसई रेल्वे रूळाजवळ शाबीरा खान या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि त्यांचे सहकारी पथक यांनी तपास सुरु केला होता. मात्र, मारेकऱ्याने घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नव्हता.

- Advertisement -

असा लागला शोध

पोलिसांना मृत महिलेच्या पायात चांदीच्या पैजणांवर ज्वेलर्सच्या दुकानाचा स्टॅम्प आढळून आला. `मलार` नामक तमिळ भाषेत असलेल्या या तामिळनाडू येथील ज्वेलर्सच्या दुकानाची माहिती पोलिसांनी इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनानुसार आणि फौजदार मुद्गून यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तामिळनाडू राज्यात जाऊन दुकान शोधले. या दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला, तिच्या अंगावरील कपडे आणि तिने परिधान केलेले पैजण यांचे पोस्टर तिरूवन्नामलाई शहरात सर्वत्र प्रसारित केले. याच भागातील राधापूरम या गावातील असलेल्या खलील शेख याने त्याची पत्नी शबिरा खान (५०) ही १६ मे पासून मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शबिरा खान हिच्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक विश्लेषण केले असता १४ आणि १६ मे रोजी कोपर रेल्वे स्थानकावर आल्याचे आणि त्यानंतर मोबाईल बंद झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी शाबिराच्या संपर्कात असलेल्या मन्सूर शेख याच्यावर संशयाची सुई स्थिरावली. हा मन्सूर पश्चिम बंगाल येथे मूळ गावी गेला असावा, असा संशय होता. मात्र, पुन्हा तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तो केरळ राज्यातील पाईपाडलंड (कोट्टायम) भागात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेश पालटून मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख (४२) याच्या मुसक्या आवळल्या. चौकशी दरम्यान शबिरा खान हिला त्याने कोपर परिसरात असलेल्या चाळीमध्ये खोली घेऊन राहू असा दबाव टाकत होती. मात्र, मारेकरी मन्सूर याला कोपर परीसरात राहणे मान्य नव्हते. या कारणावरून दोघांममध्ये वारंवार वाद होत होते. अखेर तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने मन्सूर याने शबीरा शेखचा खून केला आणि तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला.


हेही वाचा – पितर घालण्याच्या वादातून पाचव्या पत्नीचा खून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -