Orange Alert : राज्यात मेघगर्जनेसह पाऊस, गारपीटीचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Orange Alert : राज्यात मेघगर्जनेसह पाऊस, गारपीटीचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

राज्यात उकाड्याने गिअर चेंज केला असला तरीही प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत मात्र येत्या दिवसांमध्ये राज्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे मघे गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात गारपीटीची शक्यता असल्याचे हवामाना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात १८ मार्च ते २० मार्च दरम्यान मेघ गर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अवकाळी पावसाचे हे आहे कारण

मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वाऱ्याच्या आंतर क्रियेच्या प्रभावाखाली राज्यात 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा प्रभाव असेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उकाड्याचा गिअर शिफ्ट

राज्यात सोमवारी १५ मार्चला सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातील भरमपुरी येथे ३९.९ डिग्री सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली. यंदाच्या उकाड्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी ३९.९, मालेगाव ३८.८, यवतमाळ ३८.७, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली येथे ३८ डिग्री सेल्सिअस, सोलापूर ३७.९ डिग्री सेल्सिअस, परभणी आणि वर्ध्यात ३७.५, अमरावती ३७.४, नागपूर ३७.२, जेऊर ३७ तर उर्वरीत राज्यात ३५ डिग्री सेल्सिअस ते ३७ डिग्री सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली.


 

First Published on: March 16, 2021 10:15 AM
Exit mobile version