कुठे उन्हाच्या झळा तर कुठे बरसणार पाऊस? पुढचे पाच दिवस असं असेल हवामान

कुठे उन्हाच्या झळा तर कुठे बरसणार पाऊस? पुढचे पाच दिवस असं असेल हवामान

राज्यात सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. तर दुपारी उन्हाचे चटकेही जाणवत आहेत. दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरीही पडत आहेत.

राज्यात उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्याचवेळी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 ते 24 मे दरम्यान वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम व जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस महाराष्ट्रात विदर्भात कोसळणार आहे. तर दुसरीकडे पुढचे 2 दिवस महाराष्ट्रासह देशभरात काही ठिकाणी तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. तसचं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ( Monsoon news Update Imd Say light Moderate isolated rainfall with thunderstorm winds over Vidarbha and Chhattisgarh during next 3 days )

देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यातच पुढचे दोन दिवस कडक ऊन आणि उकाडा याचा सामना नागरिकांना करावा लागमार आहे. तर मंगळवारी, देशभरातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

हवामान खात्याने काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळू शकते. 22 ते 23 मे रोजी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: महाराष्ट्र आणि बाडेन-वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार – दीपक केसरकर )

पुढील पाच दिवसांत आद्र हवा आणि उच्च तापमानामुळए कोकण भागात तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.

First Published on: May 21, 2023 8:37 AM
Exit mobile version