Monsoon: कोल्हापूरात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची पातळी १२ तासात १० फुटांनी वाढली

Monsoon: कोल्हापूरात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची पातळी १२ तासात १० फुटांनी वाढली

राज्यात चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. कोल्हापूरात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असल्याचे पहायला मिळत आहे. कोल्हापूरात सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचया पाण्याची पातळी १२ तासात तब्बल १० फुटांनी वाढली आहे. (Monsoon: Three consecutive days rains in Kolhapur, Panchganga river level rises by 10 feet in 12 hours) पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास पंचगंगा नदीच्या पाण्याची धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यासह एकूण १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कोल्हापूरातील असंख्य घरे देखील सध्याच्या परिस्थिती पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे कोल्हापूरच्या वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. गडहिंग्लज, चंदगड राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते देखील बंद झाले आहेत.

 

पंचगंगा नदीची पातळी जेव्हा ३९ फुटांपर्यंत पोहचते तेव्हा ती इशारा पातळी घोषीत केली जाते. त्याचप्रमाणे पंचगंगा नदी ज्यावेळेस ४३ फुटांपर्यंत पोहचते तेव्हा ती धोक्याची पातळी म्हणून घोषित केली जाते.  राजाराम बंधारा पूर्णपणे पाण्यासाखाली गेल्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी,गगनबावडा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाण्याचा पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे गडहिंग्लज,आजरा,चंदगड या भागात देखील पावसाचा जोर कायम आहे. नद्या दुथडी भरुन वाहत आहेत त्यामुळे इथले लहान लहान पुल पाण्यााखाली गेले आहेत.

कोल्हापूरात सतत तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या किनाऱ्यालगच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना स्थलांतरीत होण्याचा आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीची पातळी किती वाढल्यास इथल्या नागरिकांना स्थलांतरीत करायचे याच्या सूचना नियोजन मंडळाच्या बैठकीत करण्यात आले आहे.


हेही वाचा – Weather Update: मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

 

 

 

 

First Published on: June 17, 2021 8:06 AM
Exit mobile version