कृषी विभागात आठ हजारांहून अधिक पदे रिक्त

कृषी विभागात आठ हजारांहून अधिक पदे रिक्त

राज्यातील कृषी खात्यात आठ हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा दावा फोल ठरला आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारं मनुष्यबळ कमी आहे. सध्या राज्यात कृषी खात्यात सर्व प्रकारची एकूण ८,७०९ पदे रिक्त आहेत.

राज्यात कृषी खात्यात २७,४५३ एकूण मंजूर पदांची संख्या आहे. मात्र, १८,७४४ पदेच भरली गेली आहेत. जुलै २०१९ पर्यंत एकूण ८,७०९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नतीने भरावयाची १,७७७ (२७ टक्के), तर नामनिर्देशाद्वारे भरावयाची ६,९३२ (३३ टक्के) पदांचा समावेश आहे.

First Published on: October 6, 2020 7:59 AM
Exit mobile version