नाशिकमध्ये मोठा फूड प्रोसेसिंग उद्योग सुरु होणार

नाशिकमध्ये मोठा फूड प्रोसेसिंग उद्योग सुरु होणार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांना निवेदन देताना निमाचे शिष्ठमंडळ

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, टोमॅटोसह अन्य पिके मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, येथे मोठ्या प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी दवडल्या जात आहेत. तसेच जिल्ह्याचा विकासही हव्या त्या गतीने होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन दिंडोरीला फूड प्रोसेसिंग हब उभारण्याच्या विचार सुरु आहे. या क्षेत्रातील मोठा उद्योग यावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याची महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनीरिंग झोनदेखील नाशिकमध्ये विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अंबड औद्योगिक वसाहतीतील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे अनबलगन यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नाशिक विभागाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील,  धुळे, तुपे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. निमाच्या वतीने सांगण्यात आले की, गेल्या १५ वर्षांत नाशिकमध्ये कोणताही मोठा उद्योग आलेला नाही. याउलट अनेक मोठे उद्योग बंद पडले आहेत. बंद पडलेल्या मोठ्या उद्योगांऐवजी दुसरा मोठा उद्योग येणे अपेक्षित असतांना भूखंड विभागून लहान उद्योगांना देण्यात येतो. मोठ्या उद्योगास अनुकूल धोरण असावे.

अंबड येथील फ्लॅटेड बिल्डिंगमधील गाळ्यांचे जास्त दर असून ते रास्त असावेत, भूखंड वितरण समितीवर औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी असावेत, गाळेधारकांना देखील उद्योग विस्तारासाठी भूखंड उपलब्ध व्हावेत यासाठी भूखंड वाटप धोरणात बदल व्हावेत, प्रलंबित असलेला सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न, दिंडोरी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उपलब्ध व्हावेत व दर वाजवी असावेत, आयटी पार्क बिल्डिंगचा प्रलंबित प्रश्न, अंबड अग्निशमन केंद्रात कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता, सिकॉफचा प्रलंबित असलेला इमारत पूर्णत्वाच्या दाखल्याचा प्रलंबित प्रश्न, पांजरापोळची जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिग्रहित करून उद्योगांसाठी खुली करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात. यावेळी निमातर्फे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, मानद सचिव सुधाकर देशमुख, निमाच्या औद्योगिक विकास व धोरण समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, कार्यकारिणी सदस्य संजय महाजन, रावसाहेब रकीबे, अतुल अग्रवाल आदी उपस्थित होते.

निमा सिन्नरच्या पदाधिकार्‍यांनी उन्हाळ्यात मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीस भेडसावणारा पाण्याचा प्रश्न व १००० घनमीटर अतिरीक्त पाणी उपलब्ध व्हावे ही मागणी केली. सेवा कर, जिंदाल जवळच्या रस्त्याचे चौपदरीकरण, ’जे’ ब्लॉक संबंधी प्रश्न, औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनस व स्वच्छता गृहांची आवश्यकता देखील पदाधिकार्‍यांनी चर्चेदरम्यान मांडली. यावेळी निमासह आयमा, लघु उद्योग भारती, जळगाव,  अहमदनगर, चाळीसगाव, धुळे येथील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयमाच्या वतीने सांगण्यात आले की, सिईटीपी प्लट साठी दुसर्‍या औद्योगिक वसाहतीत जागेचे आरक्षण करावे, ट्रक टर्मिनलसाठी गौतम नगर अंबड  येथील जागेचे आरक्षण करावे, अंबड फायर स्टेशनसाठी कायमस्वरूपी कर्मचारी भरावेत, इंडिया बुल्स जागा, मापरवाडी, राजूर, दिंडोरी शिल्लक जागेचे अधीग्रहण करावे, औद्योगिक वसाहतीमधील ड्रेनेज लाईन टाकावी, पाणी पुरवठ्याच्या पाइप लाइन बदलाव्यात, पाण्याचे नियोजन आणि भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे,पांजरपोळ जागा उद्योगांसाठी आरक्षीत करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात. यावेळी आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयपीपी राजेंद्र आहिरे, खजिनदार उन्मेष कुलकर्णी, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.

अनबलगन यांनी जाहीर केलेले महत्त्वाचे निर्णय 

 

 

First Published on: January 23, 2020 9:33 PM
Exit mobile version