परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचं स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं : खासदार अमोल कोल्हे

परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचं स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं : खासदार अमोल कोल्हे

कोरोना विषाणूमुळे ज्या लाखो लोकांचा बळी गेला त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. करोडो देशवासीयंच्या प्रती सहवेदना प्रकट करतो की, ज्या लोकांना हॉस्पीटल, बेड आणि त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी त्यांना अनेक ठिकाणी भटकावं लागलं. परदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली पाहीजे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचं स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांसाठी आरटीपीसीआर वर लक्ष देणं महत्त्वाचं आहे.असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये कोविड-१९ च्या प्रादुर्भावाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. कोल्हे म्हणाले की, डॉक्टर्स, स्टाफ, सफाई कामगार आणि आशा वर्कर्स यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण याच लोकांनी कोरोना विषाणूसारख्या भयावह संकटाचा मोठ्या प्रमाणात सामना केला.

आपल्याला सगळयांना माहिती आहे की, संपूर्ण जगभरासह देशात सुद्धा ओमिक्रॉन विषाणूचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे राजकरणापेक्षा विषाणूवर मात करणं महत्त्वाचं आहे.सुरूवातीपासूनच ज्याला आपण कोरोनाची लढाई म्हणत आलो आहोत. त्याचं दृष्टीकोनातून मी प्रयास करत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी काही नियमांच पालन करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे रणनिती आखली गेली पाहीजे. या रणनितीमध्ये आपण कोरोनाला नियंत्रण करू शकतो की रूग्णांच्या मृत्यूची संख्या कमी करू शकतो. या दोन्ही मुद्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कोरोना विषाणू सारख्या रोगावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण असतं. यामुळे परदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली पाहीजे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांचं स्क्रिनिंग करणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांसाठी आरटीपीसीआर वर लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी मैदानात उतरणं महत्त्वाचे आहे. आगामी काळात देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकां व्यतिरिक्त कोरोना विषाणूचा सामना केला पाहीजे. असं कोल्हेंनी म्हटलं आहे.

First Published on: December 2, 2021 9:02 PM
Exit mobile version