‘लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’

‘लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’

‘मी कोणतीही बातमी ऐकलेली नाही. तसेच मी ऐकीव बातम्यांवर प्रतिक्रिया देखील देत नाही. परंतु, असे घडू शकते हे नाकारता येत नाही. हे असे झाले की, लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’, अशी परिस्थती उद्भवली असल्याची प्रतिक्रिया खासदार गिरीष बापट यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला हा पहिला धक्का बसला आहे. खाते मिळण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे.

तीन पायाच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकते

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पायाचे सरकार आहे. त्यामुळे या तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही होऊ शकते. त्याचप्रमाणे सरकारमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं हा संदेश आजवर सरकारच्या माध्यमातून गेला आहे. परंतु भविष्यात काय होईल याची चुणूक यातून दिसते.तीन पक्षांचं सरकार आपल्या तत्त्वांशी तडजोड करून सत्तेवर आले आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

..यामुळे दिला राजीनामा

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. तसेच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होते, असे सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगू लागल्या आहेत.


हेही वाचा – शिवसेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा


 

First Published on: January 4, 2020 1:14 PM
Exit mobile version