घरताज्या घडामोडीशिवसेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा

शिवसेनेला धक्का; अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Subscribe

अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. खाते मिळण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा शिवसेनेच्या एका नेत्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. तर अब्दुल सत्तार यांनी कोणत्याही नेत्याकडे राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे एकूणच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी अर्जुन खोतकर देखील प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

…यामुळे दिला राजीनामा

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. तसेच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होते, असे सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगू लागल्या आहेत.

सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत याचं मौन

अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे की, ‘हा राजीनामा का दिला आहे याविषयी मला माहित नाही आणि मी याविषयी कोणतेही वक्तव्य करणार नाही’, असे म्हणत संजय राऊत यांनी मौन धारण केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत याचं मौन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -