VIDEO: खासदारांचा ‘ओ लडकी आँख मारे’ गाण्यावर डान्स

VIDEO: खासदारांचा ‘ओ लडकी आँख मारे’ गाण्यावर डान्स

खासदार मधुकर कुकडे डान्स

भंडारा जिल्ह्यातील एका शाळेच्या सांस्कृतीक कार्यक्रमात खासदारांनी भन्नाट डान्स केला आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांनी केलेला डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भंडारा जिल्ह्यात एका ज्युनिअर कॉलेजच्या स्नेहसंमेलनमध्ये विद्यार्थिनींनी सिंम्बा चित्रपटातील ‘ओ लडकी आँख मारे’ या गाण्यावर डान्स करत होत्या. दरम्यान खासदारसाहेबांनी देखील या गाण्यावर ठेका धरत रणवीर सिंग सारखा डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाळेतील कार्यक्रमातही डान्स

६५ वर्षाचे खासदार मधुकर कुकडे यांनी ५ तारखेला मोहाळी तालुक्यातील एका ज्युनिअर कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करत होते. त्याआधी त्यांनी २९ डिसेंबरला गोदेगाव तालुक्यातील एका आदिवासी शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रमादरम्यान डान्स केला होता. तो देखील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये खासदारांनी गाण्यावर ठेका धरल्यामुळे समोर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्यासोबत डान्स केला आहे. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन देत डान्स केला आहे.

कुकडेंचा परिचय

कुकडे हे २०१८ मध्ये भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. नाना पटोल यांनी राजीनामा दिल्यानंतर या मतदार संघात पोटनिवडणुक झाली. त्यानंतर ते याठिकाणी खासदार म्हणून निवडणून आले. त्याआधी कुकडे हे १९९५ ते २००९ या काळात म्हणजे तीन वेळा आमदार होते.

हेही वाचा – 

माही आणि जिवाचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल

First Published on: January 7, 2019 4:14 PM
Exit mobile version