Sanjay Raut : चुन चुन कर आगे बढूंगा मै..,खासदार संजय राऊतांचे भाजपला आव्हान

Sanjay Raut : चुन चुन कर आगे बढूंगा मै..,खासदार संजय राऊतांचे भाजपला आव्हान

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राऊतांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तक रोकोगे, असं म्हणत त्यांनी भाजपला आणि ईडीला आव्हान दिलं आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे.

संजय राऊतांनी एक ट्वीट केलंय. त्यामध्ये मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेंकोगे! चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तक रोकोगे, अशा प्रकारचं ट्विट राऊतांनी केलं आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. गावकऱ्यांना धमकावून कमी पैशात जमीन खरेदी केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे. त्यानुसार राऊत यांच्यावर आजची कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत एकूण ११ कोटी १५ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर आहे. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. अशा गैरव्यवहारातील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत, असे राऊत म्हणाले.


हेही वाचा : संजय राऊत यांच्याभोवती ईडीचा फास; ईडीच्या कारवाईविरोधात आघाडीत संताप


 

First Published on: April 5, 2022 9:27 PM
Exit mobile version