खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही – शरद पवार

खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही – शरद पवार

MP Sharad Pawar said decision to support MP Sambhaji Raje was not of one party only

खासदार संभाजीराजे राजकारणात प्रवेश करणार आहेत. याबाबत आपली भूमीका ते 12 मेला पुण्यात मांडणार आहेत. याबद्दल मी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे, त्यामुळे 12 तारखेला ते जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. दरम्यान संभाजीराजेंना पुन्हा खासदारकीसाठी पाठिंबा देण्याबाबत खासदार शरद पवारांना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मीदेखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

 

दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांचे शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी खासदारपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले.

First Published on: May 10, 2022 6:49 PM
Exit mobile version