MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ‘या’ दिवशी करता येणार अर्ज

MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ‘या’ दिवशी करता येणार अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षा (Entrance Exam) देता आली नाही त्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.  परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी पुन्हा अर्ज दाखल करू शकणार आहेत त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हे उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत.

अर्ज दाखल करण्याचा कालावधी

२७ डिसेंबर २०२१ सकाळी ५ वाजल्यापासून
३१ डिसेंबर २०२१ रात्री ११:५९ वाजेपर्यंत

ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत उमेदवारांना MPSCच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे परीक्षा शुल्क भरता येणार आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची फोटो कॉपीसह १ जानेवारी २०२२ पर्यंत शुल्क भरता येतील. तसेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचे असतील भारतीय स्टेट बँकेमध्ये ३ जानेवारी २०२२पर्यंत शुल्क भरता येणार आहेत.


हेही वाचा –  अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये?

First Published on: December 27, 2021 10:25 PM
Exit mobile version