ऑक्सिजन निर्मितीसाठी महावितरणचा खारीचा वाटा, JSW ला ४२ तासांमध्ये वीजभार वाढ

ऑक्सिजन निर्मितीसाठी महावितरणचा खारीचा वाटा, JSW ला ४२ तासांमध्ये वीजभार वाढ

मुंबईत लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा

मानव जातीवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाशी सर्वच यंत्रणा एकमेकांच्या मदतीने लढा देत आहेत. त्यात भांडूप नागरी परिमंडल अंतर्गत पेण मंडळ कार्यालय ही अग्रेसर आहे. महावितरण कंपनीतर्फे तत्परता दाखवित मे. जे. एस. डब्ल्यू या अतिउच्चदाब वीज ग्राहक ऑक्सिजन उत्पादक कंपनीस 42 तासात वीजभारात वाढ करुन देऊन कोरोना लढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच तत्काळ अशी ९५ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य झाले आहे.

कोरोना बाधेमुळे अति संवेदनशील स्तिथीतील रुग्णांकरिता ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र आरोग्य यंत्रणेस ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी, श्रीमती. निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादारांची बैठक घेतली. या बैठकीत मा. जिल्हाधिकारी महोदयांनी ऑक्सिजन पुरवठादारांना ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, मे. जे. एस. डब्ल्यू या ऑक्सिजन उत्पादक कंपनीने प्रकल्प क्षमता वाढविणे शक्य असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी महावितरण कंपनीकडून वाढीव वीजभार मंजूर होणेबाबत चर्चा केली.

जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळपणे महावितरण मुख्य कार्यालय, प्रकाशगड, वांद्रे येथे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व संबंधीत कंपनीला वीजभार वाढवून देण्याबाबत सहकार्य करण्याची सूचना केली. कोव्हीड-19 विशेष रुग्णालयांकारिता वाढती ऑक्सिजनाची गरज लक्षात घेऊन निर्मिती प्रकल्पाची क्षमता वृद्धी करण्याचे दृष्टीने मे. जे. एस. डब्ल्यू कंपनीने औद्योगिक व वसाहतीतील नियोजन आखले होते. त्यानुसार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सदर मागणी त्वरित पूर्ण करण्याचा निर्धार करुन मुख्यालयातील संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्याप्रमाणे,संबंधीतअधिकाऱ्यांनी याची दाखल घेऊन सदर कंपनीचा वाढीव भार तात्काळ मंजूर केला. प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, भांडूप नागरी परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, पेण मंडळ दीपक पाटील यांनी वाढीव विद्युत भार कार्यान्वित करण्याबाबत आवश्यक तयारी केली.

महावितरणच्या अधिकारी – कर्मचारी यांनी संबंधित ग्राहकांशी थेट संपर्क साधून वीजभार वाढीसाठी आवश्यक कागदपात्रांची पूर्तता एका दिवसात पूर्ण करुन घेतली.  अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या देखरेखखाली चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून तत्परता दाखविली व विद्युत भार कार्यान्वित करुन कोरोना लढ्यात यशस्वी योगदान दिले.तसेच, महापारेषण कंपनीचे मुख्य अभियंता नासिर कादरी यांनी या कामात मोलाची मदत केली. मे. जे. एस. डब्ल्यूचे अध्यक्ष गजराज सिंह राठौड़ यांनी या संकट काळात महावितरणने केलेल्या सहकार्याबद्दल महावितरणचे आभार मानले.


 

First Published on: April 15, 2021 7:44 PM
Exit mobile version