म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार उपचार

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना राज्य सरकारचा दिलासा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार उपचार

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु कालांतराने कोरोना आपले रुप बदलत चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भयंकर झाला आहे. कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतरही वेगवेगळे आजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार भयंकर वेगाने पसरत असल्याने या आजाराने बाधित रुग्णांची नोंदी होऊ लागल्या आहेत. या आजारामुळे रुग्णाचे डोळे निकामी होत आहेत. तसेच काही रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. राज्य सरकारने या आजाराच्या रुग्णांसाठी दिलासा दायक निर्णय घेतला असून आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जन-आरोग्य योजनेत केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार राज्य सरकारच्या महात्मा फुले जन-आरोग्य योजनेतून करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अशा आजाराची प्रकरणे आढळली आहे. या आजारातील काही रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. हा आजार झाल्यास अत्यल्प कालावधीनंतर रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित आजाराचे निदान झाल्यास रुग्णाला योग्य उपचार देता येतो.

म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जन-आरोग्य योजनेतून करण्यात आल्यामुळे या आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने रुग्णांच्या आरोग्याचा विचार करता मोठा निर्णय घेतला आहे. जे रुग्ण कोरोना किंवा अन्य अजारांनी ग्रासले असून त्यावर उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी असते त्यामुळे या रुग्णांना म्युकरमायोकसिस या बुरशीजन्य आजाराची लागण होते. या आजारामध्ये रुग्णाचे डोळे लाल होतात तसेच नाक आणि डोळ्यांच्या भागाला वेदना सुरु होतात.

कधी तपासणी कराल ?

– नाक बंद होणे, नाक खूपच गळणे, नाकातून काळ रक्त आल्यावर, नाकाचा शेंडा दुखू लागल्यावर
– चेहऱ्याच्या एकाच बाजुला दुखू लागणे किंवा सूज वाढल्यावर
– नाकावर काळे दिसून लागणे
– दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे
– डोळ्यांना धूसर दिसणे किंवा डोळे दुखणे, ताप येणे
– छातीत दुखणे, श्वास घेण्यासाठी अडथळे निर्माण होणे

First Published on: May 10, 2021 10:13 PM
Exit mobile version